निलेश राणेंची कोरोनावर मात ; शुभेच्छा देणाऱ्यांचे मानले आभार

nilesh-rane

मुंबई : माजी खासदार निलेश राणे कोरोनामुक्त झाले आहेत. निलेश राणेंचा (Nilesh Rane) कोरोना (Corona) अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांनी स्वतः याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असे निलेश राणेंनी म्हटले . राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

आतापर्यंत अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. १६ ऑगस्ट रोजी निलेश राणेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यावेळीही त्यांनी ट्विट करून याबद्दल माहिती होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निलेश राणे तत्काळ आपल्या मुंबईतील घरात सेल्फ क्वारंटाईन झाले होते. याचसोबत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER