छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता; निलेश राणेंचा हल्लाबोल

Nilesh Rane-Sanjay Raut

मुंबई :- चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या अग्रेलखातून केला. यावरून भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता असं म्हणत यावर जोरदार हल्लाबोल केला.

लाज सोडली शिवसेनेनी. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा (Sanjay Raut) केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय? जनाची नाही पण किमान मनाची लाज तर ठेवा,असे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेला धक्का ; मोठा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER