जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार; राणेंचा शरद पवारांना टोला

Nilesh Rane-Sharad Pawar

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . यावर छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांची नियुक्ती भाजपाने केली आहे. त्यामुळे ते त्यांचीच भाषा बोलत आहेत. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. शरद पवारांच्या या विधानावरुन आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राणे ट्विट करत म्हणाले की, शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आर्श्चर्य वाटतं. पण जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं की शरद पवारांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER