मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढणे ही पहिली मागणी असावी; निलेश राणेंचा घणाघात

Nilesh rane-Ashok Chavan

मुंबई :- मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) भाजपा नेते निलेश राणे निलेश राणे (Nilesh rane) यांनी अशोक चव्हाणांवर (Ashok Chavan) हल्लाबोल केला आहे. “मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढा. मी अनुभवातून सांगतो, या व्यक्तीला काही कळत नाही.

उद्धव ठाकरेंप्रमाणे (Uddhav Thackeray) यांना पण सगळं आयतं मिळालं म्हणून विषय समजत नाही. या पदावर हुशार व आक्रमक व्यक्तीची गरज आहे.” असे निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

दरम्यान मराठा आंदोलनात राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी असा वाद लावायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. तसंच आंदोलन करताना त्यात कुठल्या कुठल्या पक्षांचे लोक आलेले  आहेत हा संशोधनचा विषय आहे, असेही ते म्हणाले होते. यावरून निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे .

ही बातमी पण वाचा : सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पवारांचे प्रयत्न, भाजप नेत्याचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER