महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?निलेश राणेंचा संताप

Nilesh Rane & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्च्याकडून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.

ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका एसटी बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितल्याचा प्रकार सोमवारी समोर आला होता. यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं  आयुष्य पणाला लावलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा झेंडा काढण्याची वेळ या ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने आणली.

महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे? असा सवाल भाजपा (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान ठाण्यातील आनंदनगर येथून मुंबईच्या दिशेनं जात  असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला होता. त्यानंतर एसटी चालकानं हा झेंडा काढल्याचा प्रकार घडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER