…म्हणून लवासामध्ये कोणी टोपी घातली हे माहीत असूनही शेतकरी गप्प : निलेश राणे

Nilesh Rane

मुंबई : काही लोक कॅगचा हवाला देऊन जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेवर टीका करत आहेत. परंतु त्यांच्याच कुटुंबावर इरिगेशन स्कॅम, लवासा स्कॅम आणि २ जी स्कॅम या विषयांवर कॅगने काय लिहिलंय हे पण एकदा वाचून घ्यावं. तिकडचे शेतकरी सहनशील आहेत म्हणून लवासामध्ये कोणी टोपी घातली हे माहिती असूनसुद्धा ते बिचारे गप्प आहेत- असे म्हणत भाजप (BJP) नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.

त्यांनी यासंदर्भात ट्विट करत निशाणा साधला. दरम्यान जलयुक्त शिवार ही तत्कालीन फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. दरम्यान, ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅगने अहवालात नमूद केलं आहे. त्यानंतर अनेकांकडून यावर टीका करण्यात येत आहे. परंतु आता लवासावरून निलेश राणे (Nilesh Rane) यांनी निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER