अन्वय नाईकांची आत्महत्या पटत नाही, पैशांचे कारण न पटणारे : निलेश राणे

Nilesh Rane - Anvay Naik

मुंबई : रिपब्लिक टीव्ही (Republic TV ) वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami Arrested) यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्यभरात आंदोलनं पुकारली.

तसेच भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी याप्रकरणावर भाष्य केले. मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (Anvay Naik) यांनी आत्महत्या का केली? याचे सत्य नक्की बाहेर पडेल, असे ट्विट निलेश राणे यांनी दिली आहे. तब्बल ३०० कोटींचा मालक पाच-सहा कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही. यात काही वेगळेही कारण असू शकते आणि त्याची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत, असेही राणे म्हणाले.

“अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये स्थानिकांकडून माहिती काढल्यानंतर असं कळलं की, त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण पैसे होऊ शकत नाही, ती आत्महत्या नाही, असे अलिबागमधील काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेलच, असे राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER