उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे काम झेपत नाही : नारायण राणे

Narayan Rane on Uddhav Thackeray shivsena

कुडाळ :- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे काम झेपत नाही, असे टीकास्त्र भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सोडले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी सिंधुदुर्ग येथे पत्रपरिषद घेतल्यानंतर, राणे यांनी काही वेळातच कुडाळ येथे पत्रपरिषद घेतली आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे काम झेपत नसल्याने, राज्यात मध्यावधी निवडणूक होणे पक्के आहे, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला.

महाराष्ट्रात एनआरसी लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी पत्करली असून, शिवसैनिकांना ही बाब आवडलेली नाही. कोकणात मुख्यमंत्री ठाकरे पर्यटक म्हणून आले आणि फसव्या घोषणा करून परतले, असा आरोपही यावेळी राणे यांनी केला.