नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार? अमित शहांच्या कोकण दौऱ्यामुळे चर्चेला उधाण

narayan rane & amit shah

मुंबई : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) हे रविवारी कणकवलीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यानंतर भाजपला देशभरात यश मिळण्यात अमित शहा यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अमित शहा  यांच्यासारख्या व्यक्तीने नारायण राणे यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याच्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात येणे, ही मोठी बाब आहे. सध्या शेतकरी आंदोलन आणि इतर बाबींमुळे गृहमंत्री  अमित शहा  अत्यंत व्यग्र असतात. मात्र, या सगळ्या कामकाजातून त्यांनी  नारायण राणेंच्या कार्यक्रमासाठी दोन तासांचा वेळ काढला.

पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्यावर खूश असून त्यांना लवकरच बढती मिळण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात भाजपला लक्षणीय यश मिळाले. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला नारायण राणे यांच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकतो.

याशिवाय, शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात असलेला ३६ चा आकडा पाहता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून नारायण राणे यांच्या खांद्यावर महत्त्वाची  जबाबदारी देण्यात येईल .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER