भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वडिलांचे निधन

Ashish Shelars father Babaji Shelar passes Away

मुंबई :- भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांचे वडील बाबाजी शेलार यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

गेल्या काही महिन्यांपासून बाबाजी शेलार हे आजारी होते. आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात विवाहित मुलगी वैशाली, मुलगा माजी नगरसेवक विनोद शेलार आणि आमदार ॲड. आशिष शेलार, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बाबाजी शेलार हे आयकर खात्यातून सेवानिवृत्त झाले होते. अध्यात्माची त्यांना विशेष गोडी होती. आध्यात्मिक वाचन, चिंतन असा त्यांचा आवडीचा विषय होता.

दरम्यान, आमदार ॲड. आशिष शेलार आणि शेलार कुटुंबीयांनी सर्व कार्यकर्ते, मित्रपरिवार यांना आवाहन केले आहे की, आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आपण सगळे आमच्यासोबत सदैव आहातच.  त्यामुळे सद्य:स्थितीत कृपया प्रत्यक्ष भेटीऐवजी मोबाईल, मेसेजद्वारेच भेटू. आपण सगळे आम्हाला सहकार्य कराल, अशी विनंती त्यांनी केली आहे.