भाजपच्या मेधा कुळकर्णी मनसेच्या वाटेवर, मात्र कुळकर्णींनी दिलॆ हे स्पष्टीकरण

Medha Kulkarni-Raj Thackeray

पुणे :- विधानसभेला तिकीट कापल्यानंतर विधानपरिषदेतही उमेदवारी नाकारल्याने कोथरुड मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मेधा कुलकर्णी मागील वर्षभरापासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मनसेप्रवेशाच्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण कुळकर्णी यांनी दिले आहे. तर दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी मिळणं कठीण वाटत असल्याने मेधा कुळकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मनसे (MNS) शहराध्यक्ष अजय शिंदे यांनीही मेधा कुळकर्णी यांच्या मनसे प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यातल्या बदलत्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावल्याची माहिती अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतरही मेधा कुळकर्णी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. बरोबर एका वर्षापूर्वी त्यांच्यात भेट झाली होती. विधानसभेला भाजपने तिकीट कापल्याचा प्रकार ताजा असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र मेधा कुळकर्णी यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही राजकीय नव्हती, तर मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी होती.

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी मनसेप्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. आपण नाराज नसून, पक्षांतराच्या खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याची प्रतिक्रिया कुलकर्णींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER