अजित पवारांनी धोतर फेडण्याची भाषा केलेल्या ‘त्या’ नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

bjp-leader-madhukar-pichad-supporter-sitaram-gaikar-will-join

अहमदनगर :- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेगाभरतीचे सत्र सुरु आहे .भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे . ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर (Sitraam Gaikar) हे आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मुधकर पिचड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या सीताराम गायकर यांची धोतर फेडण्याची भाषा केली होती. त्यानंतर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांनी गायकर यांचा पराभवही केला होता.

या सगळ्यानंतर राज्यात महाविकासआघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता येऊन आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पाठिंब्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सीताराम गायकर हे बिनविरोध निवडून आले होते. तेव्हापासूनच सीताराम गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. सीताराम गायकर यांच्यासह अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे 9 सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सीताराम गायकर यांच्या मदतीने अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत मधुकर पिचड यांना धक्का देण्याची राष्ट्रवादीची रणनीती असल्याची माहिती आहे .

ही बातमी पण वाचा : पवार किंवा प्रमुख नेते का बोलत नाहीत? फक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER