शिवसेनेत इनकमिंग सुरु; आज भाजपातील औरंगाबादचे दिग्गज शिवबंधनात अडकणार

kishanchand-tanwani - CM Uddhav Thackeray

मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद येथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर गजानन बारवाल आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे सर्व जण ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान किशनचंद तनवाणी हे याआधी शिवसेनेतच होते. ते शिवसेनेचे आमदार आहेत.

इंदोरीकर महाराजांना रोहित पवारांचे समर्थन म्हणाले, ‘खोलात जाण्याची गरज नाही’

किशनचंद तनवाणी औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तनवाणी आणि गजानन बरवाल आज ‘मातोश्री’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर तनवाणी हाती शिवबंधन बांधतील. औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याच्या हालचालींना मुख्यमंत्र्यांकडून वेग आलेला आहे. अशातच मनसे आणि भाजपनेही निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

दरम्यान, एप्रिल २०२० मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे आणि भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांपुढे तगड्या एमआयएमचंही आव्हान आहे.