उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील : भाजप नेत्याचा आरोप

Maharashtra Today

मुंबई :- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.

मी नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेव्हा शिवसेनेचे १२ नेते माझ्याविरोधात एकटवले होते. मात्र, आता हे सगळे कुठे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना फटकारले होते. किरीट सोमय्या ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात इतका रस का घेत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER