शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का ? किरीट सोमय्यांचा सवाल

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

मुंबई :- औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा (Shiv Sena) भगवा हिरवा झाला आहे का ? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेस (Congress) पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर (Sambhaji Nagar) या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेला धक्का : उपशहरप्रमुख मेंनेंजिस सातन पुन्हा काँग्रेसमध्ये परतले

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद पेटला आहे . भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी केली जात आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र, आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शविला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER