राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; कल्याण काळे ‘घड्याळ’ बांधणार?

sharad pawar-Kalyanrao Kale

मुंबई : भाजपचे नेते कल्याण काळे (Kalyanrao Kale) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माहितीनुसार , सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याण काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते.

त्यामुळे कल्याण  काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . या कार्यक्रमात कल्याण  काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले.

पवारसाहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले. आमच्याही  काही चुका झाल्या; परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांच्या  नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याण काळे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांची आशियातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था चर्चेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER