अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपाच्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Nagnath Ghisewad Joins Congress

नांदेड : भोकर येथील भाजपाचे नेते नागनाथ घिसेवाड (Nagnath Ghisewad) यांनी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

घिसेवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. (Nanded Bhokar leader Nagnath Ghisewad joins Congress in presence of Ashok Chavan)

धिसेवाड यांना भोकर तालुक्यात मोठा जनाधार आहे. त्यांच्याजवळ कार्यकर्त्यांची फौज आहे. लवकरच भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला (Congress) स्पर्धकच राहिला नाही, अशी स्थिती आहे.

नागनाथ घिसेवाड यांनी तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक लढवली आहे. दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला. १९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अवघ्या ५०० मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर २००४ च्या विधानसभेला ते २००० मतांनी पडले. दोन्ही वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तेव्हापासून राजकारणात त्यांची बहुजन नेते अशी ओळख निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER