राजकीय वर्तुळात मोठी बातमी ; शरद पवारांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे मुंबईत दाखल

Eknath Khadse - Sharad Pawar

मुंबई :- भाजपवर नाराज असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत .

भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा असून, येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणाऱ्ये खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे .

दरम्यान ही भेट कधी होणार याची वेळ निश्चित झाली नाही . शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ खडसे सध्या त्यांच्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, मी एकनाथ खडसे आहे, लपूनछपून कोणत्याही गोष्टी करत नाही असं बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट होणार नाही, अशी शक्यताही नाकारली नाही.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजप नेत्याचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER