अखेर ठरलं ; एकनाथ खडसे अनेक नेत्यांसह लवकरच राष्ट्रवादीत

Sharad Pawar and Eknath Khadse

मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे . खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे (Shiv Sena) आणि खडसे यांचे समर्थक उपस्थितीत होते. या बैठकीत पुढील आठवड्यात राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असं ठरल्याची शक्यता आहे. धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी याबद्दल तशी माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पाटील (Sharad Patil) यांनी सेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. एकनाथ खडसे यांच्यासह आपण लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मंगळवारी जामनेरमध्ये हजर होते. ग्लोबल हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने एकनाथ खडसे आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार होते. परंतु, एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER