राजा ‘उधार’ झाला अन् हाती भोपाळ दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray

पुणे: शेतकरी प्रश्नावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला . राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले .

राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकार कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले , असेही फडणवीस म्हणाले . ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते.

आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला, अशा शब्दांत फडणवीसांनी सरकारचा समाचार घेतला.

राज्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसेच मिळाले नाहीत. राज्यात भाजपचं सरकार असताना चार वर्ष प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यवस्थित राबवण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र आता सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER