भंडारा अग्नितांडव घटना अतिशय वेदनादायी : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात १० बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की…’भंडारा घटनेवरून निलेश राणेंची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER