शिवेसेनेच्या सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा, त्यासाठी झाली भेट : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Sanjay Raut

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात शनिवारी (२६ सप्टेंबर) मुंबईतील हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळातर चर्चा रंगल्या आहे . यावर संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शिवेसेनेच्या सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी अट मी त्यांना घातली होती, खुलासा फडणवीसांनी केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER