
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील वर्षी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गौप्यस्फोट केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरू सेंटरमधील त्या बैठकीतील चर्चेनंतर अजित पवार यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून दिले आहे. यावरून भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यावरून निशाणा साधला आहे.
अजितदादा पवार आता बोला, इतके दिवस जे काही लोकांना वाटत होतं की तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही, हे संजय राऊत यांनीच उघड केले, असे निलेश राणे म्हणाले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचे नाट्य तयार झाले ही चर्चा सर्वस्वी चूक आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. “दिल्लीत पवार आणि माझ्यामध्ये उत्तम संवाद होत होता. रोजच आम्ही भेटत होतो. भाजपाशी डील करण्याच्या ते मन:स्थितीत नव्हते. पण भाजपाकडून ऑफर्स येत असल्याचे सांगत होते. लवकरच पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे आपण त्यांना सांगणार असल्याचंही त्यांनी मला सांगितले होते . याच काळात शेतकरी प्रश्नांसंदर्भात पवारांनी मोदींची भेट घेतली आणि राज्यातील सत्तेबाबतही स्पष्टीकरण दिले . त्यामुळे शरद पवारांनी भाजपाला शब्द दिला होता. त्यामुळेच पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटं आहे, असे राऊत यांनी रोखठोकमधून स्पष्ट केले आहे.
अजित दादा पवार आता बोला, इतके दिवस जे काही लोकांना वाटतं होत की तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संज्यानेचं उघड केलं. https://t.co/DChjBRQPaF
Shared by Loksatta app.
Click here to download https://t.co/cJjJvdN6wg— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 29, 2020
ही बातमी पण वाचा : ‘मराठा आरक्षणासाठी फडणवीसांच्या हातात सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’ – उदयनराजे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला