मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल; चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Chandrakant Patil - Sharad Pawar

मुंबई : मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सहसा शरद पवार खालच्या लेव्हलची स्टेटमेंट्स करत नाहीत. पण ते असे का करत आहेत, ते माहिती नाही, असेदेखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अजेंडा एक नाही आणि झेंडाही एक नाही आहे. एकमात्र अजेंडा आहे की भाजपला निवडणुकीत वेगळं ठेवणं आहे. एवढी भीती त्यांच्या मनात भाजपबद्दल आहे. ते एकत्र आले त्यामुळे आलेले निकाल अनपेक्षित नाहीत. मी त्यांना अनेकदा आव्हान दिलंय, की त्यांनी एकट्यानं लढावं, पण ते घाबरतात. ते एकत्र लढतात. तरीदेखील आम्ही या पराभवाचं चिंतन करू, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

दरम्यान विनोदी विधानं करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असा खोचक टोलादेखील शरद पवारांनी लगावला होता. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER