शेतकरी आंदोलकांची बाजू मांडणाऱ्या शरद पवारांवर भाजप नेत्याची घणाघाती टीका

Shaard Pawar-BJP

मुंबई : प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्ली इथं शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. मात्र यावेळी झालेल्या हिंसेमुळे या आंदोलनाला गालबोट लागलं. या सगळ्या घटनेबाबत आणि एकूणच शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

‘सुरुवातीला शांततेत आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने गंभीरपणे घेतलं नाही. संयम संपल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती पण ते निष्क्रिय ठरले,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली होती.

यावरून ‘हा माणूस अनेक दशकांपासून केंद्र सरकारमध्ये मंत्री होता. युक्तिवाद पाहा. राजकारणामुळे ते हिंसेचे समर्थन करत आहेत, असे ट्वीट बी एल संतोष (B L Santosh)यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं भाग्य समजतो – प्रविण दरेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER