मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला…; भाजप नेत्याचे शिवसेनेवर टीकास्त्र

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई :- आगामी काळातील महानगरपालिकांच्या निवडणुका आणि सर्वात प्रतिष्ठेच्या मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांनी आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे . येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपानं स्वबळाचा नारा दिला असून शिवसेनेसमोर भाजपाचं तगडं आव्हान असल्याचंही म्हटलं जात आहे. अशातच ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा’ असे म्हणत साद घातली होती. यावरून भाजपा (BJP) नेते आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) टीकास्त्र सोडले .

मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद… शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदारानं मनात ठाम ठरवलं आहे “मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा, असे म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर, भाजपकडून चौकशीची मागणी

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपाने कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER