उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Atul Bhatkhalkar targets CM Thackeray

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेतली . या भेटीदरम्यान राज्यातील ज्वलंत विषय बनलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह चक्रीवादळाने झालेल्या नुकसानभरपाईसंदर्भात मदत करण्याबद्दल ते पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे . मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून भाजपाने पुन्हा टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? , असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.

राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेत आहे. या भेटीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करून टीका केली आहे.

भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेला एक फोटो ट्विट केला आहे. ‘आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही. कळत नाही. वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?,’ असे म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ट्विट केलेल्या फोटोवर उद्धव ठाकरेंच्या व्यंगचित्रासह ‘उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे. सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात, असे आशय त्यांनी नमूद केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button