दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात; भाजपचा जयंत पाटलांवर निशाणा

Atul Bhatkhalkar & Jayant Patil.jpg

मुंबई :- नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) ताकद दिसून आली आहे. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली तर भाजपचे ५० आमदारसुद्धा निवडून येणार नाहीत. राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील. असे राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : भाजपने कंबर कसली; शिवसेनेत गेलेल्या ‘या’ आमदाराला परत आणण्याचे प्रयत्न

जयंत पाटील यांच्या या विधानानंतर आता भाजपनेही जयंत पाटील यांना आव्हान दिले आहे. तीन पक्ष एकत्र येऊन लढल्यास भाजपाचे ५० आमदारसुद्धा निवडून येणार नाहीत, असं म्हणणारे जयंत पाटील यांनी लक्षात ठेवायला हवं की, दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, अशी टीका भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. जयंत पाटील भाजपच्या पराभवाबाबत इतके आश्वस्त आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या. ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ देत, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER