कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण…; भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत होते. याचपार्श्वभूमीवर मंगळवारी विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला .

भातखळकर म्हणाले की, २५ आमदारांना कोरोना (Corona) चाचणी नसल्यामुळे विधान भवनात प्रवेश नाकारला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील कोरोनाची चाचणी नसल्यामुळे प्रवेश दिला नाही. मात्र मोहन डेलकर कुटुंबियांना भेटलात हे उत्तम, असं म्हणत नियम सर्वांना सारखेच हवेत, असे ते म्हणाले .

दरम्यान कोरोनाचा पुन्हा वाढलेला संसर्ग, वीजबिल तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक आहेत. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी २ मार्च रोजी विधान भवनात येत होते. मात्र विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी कोरोनाची चाचणी केलेली नव्हती. त्यामुळे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER