शरद पवारांसोबत राहून संजय राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली ; भाजप नेत्यांचा टोला

Sanjay Raut-BJP

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut)यांनी निराजी व्यक्त केली आहे . बिहारमध्ये कोरोना संपलाय का ?असा सवालही राऊत यांनी उपस्थित करत सरकारवर , निवडणूक आयोगावर आणि बिहार येथील राज्यकर्त्यांवर निशाणा साधला . यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar)यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

“सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.” असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून राऊतांवर निशाणा साधला.

दरम्यान सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसे जाहीर करा. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असे त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER