कायम घरीच बसल्यामुळे ‘त्यांना’ बाहेर काय घडतंय याचा अंदाज येत नसावा ; भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray

मुंबई : हाथरससारख्या (Hathras) घटना महाराष्ट्रात सहन करणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले होते. यावरून भाजपा (BJP) नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

गेल्या वर्षी देशभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक ४७ महिला महाराष्ट्रातील होत्या, अशी माहिती एनसीआरबीच्या अहवालातून समोर आली होती. याचाच दाखला देत भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले .

“हाथरससारख्या घटना महाराष्ट्रात सहन करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांनी राज्यातील आकडेवारी पाहावी. कायम घरी बसल्यामुळे त्यांना बाहेर काय घडतंय त्याचा अंदाजच येत नसावा, असे म्हणत भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER