अग्रलेखात सडके, पादरे शब्द वापरण्यापेक्षा… ; भाजप नेत्याचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने नोटीस (ED Notice) बजावल्यापासून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली . याचे पडसाद उमटू लागले असून भाजपाच्या नेत्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आता आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही अग्रलेखातील मजकूरावरून राऊतांवर टीका केली.

सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संपादक असलेल्या संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द वापरण्यापेक्षा ईडीने नोटीस पाठवलेल्या प्रकरणातील ५५ लाखांच्या व्यवहारावर बोलायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. “कार्यकरींनी ७०० शब्दांच्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द भांडार खुले करून विद्वत्तेचे प्रदर्शन केले आहे. (त्यापेक्षा) दोन ओळी त्या ५५ लाखांबद्दल खरडल्या असत्या, तर विषय संपला असता”, असे त्यांनी ट्विट केले. तसेच, ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिले .

अर्णबवर कारवाई होते तेव्हा ‘कायदा त्याचे काम करत होता आणि आता?, असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER