सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? आशिष शेलार

Ashish Shelar-Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात संभाजीनगरच्या(Sambhajinagar) नामांतरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपा व मनसे या मुद्यावरून आक्रमक झाली असून, सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. आतापर्यंत हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने भाजपा नेत्यांकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे.

स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा..आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर निशाणा साधलेल्याचे दिसून आले आहे. याचा संदर्भ आशिष शेलार यांनी आपल्या ट्वटिमध्ये घेतला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER