
मुंबई : मुंबईत (Mumbai) अचानक वीज पुरवठा (Power Cut) खंडित झाल्याने भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचे सर्किट ठिकाण्यावर आहे का?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे . या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली .
वीज पुरवठा खंडित होऊ शकतो याची पूर्व कल्पना सरकारला नव्हती का?, असा सवाल करतानाच वीज पुरवठा खंडित झाल्याने कुणाला दगा फटका झाला तर त्याचं पाप या सरकारवर असेल, असंही ते म्हणाले. एक तासात वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) सांगत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होईल म्हणजे तुम्ही उपकार करत नाही? आधी तासभर वीज गेलीच कशी याचे उत्तर मुंबईकरांना द्या, असेही ते म्हणाले.
मुंबईत अचानक वीज पुरवठा का जातो. या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असे सवाल करतानाच मुंबईकरांवर बेततं तेव्हा गायब होणारी ही मंडळी आहेत, अशी टीका शेलार यांनी केली. केवळ नियोजन शून्यतेमुळे विद्यार्थी आणि रुग्णांची दुरावस्था होत आहे. चाकरमानी लोकलमध्ये अडकले आहेत. हा केवळ नियोजन शून्यतेचा परिणाम आहे. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या तात्काळ निलंबित करा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे .
राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक गेलेल्या वीजेविना हाल झाले.
याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा.
ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला