महाराष्ट्रात घड्याळ्याच्या ‘टायमिंग’चे काय सांगावे : आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections) शिवसेनेचं (Shiv Sena) पानीपत झाल्यानंतर भाजप (BJP) नेत्यांकडून सडकून टीका होत आहे .

काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , काँगसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…आता…महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! (PM Narendra Modi) त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!, असे ट्वीट शेलार यांनी केले .

तसेच भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या “जगंलराज का युवराज”ला बिहारच्या जनतेने नाकरले. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत “जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज” युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असेही शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले .

दरम्यान भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER