भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा

Narendra Mehta

मुंबई : मीरा भायंदर येथील भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी मी आपल्या पक्षातील सर्व भूमिकांचा तसेच जबाबदारी आणि पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आपण अन्य कुठलाही पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच सहकारी पक्ष सदस्यांना माफी मागत असल्याचे ते म्हणाले. मी गेल्या 11 वर्षांपासून भाजपामध्ये काम करत आहो. यात अनेक उतार चढाव आले. आज अशा व‍ळणावर उभा आहे की माझ्यामुळे पक्षाला नुकसान होत आहे. माझ्या व्यवहारामुळे, माझ्या आचरणामुळे, माझ्या पद्धतीमुळे पक्षाला नुकसान होणे मला सहन होणार नाही. माझ्यामुळे माझ्या पक्षाच्या परिष्ठ नेत्यांना नुकसान होईल, त्यांना वाकावे लागेल असे मी काहीही करणार नाही. मी भाजपच्या सर्वच पदावरून राजीनामा देत आहे. मी यापुढे राजकारण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी अन्य पक्षाचेही आभार मानले आहे.

माझ्याकडून चुका झाल्या असेल तर क्षमा करावी, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या नशिबात राजकारण इथपर्यंतच होते. हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले. माझ्यामुळे पक्षाला नुकसान झाल्यामुळे मी पक्षाची क्षमायाचना मागतो. यामागे कुठलाही दबाव नाही किंवा कुणाच्या दबावामुळे राजीनामा देत नसल्याचे नरेंद्र मेहता म्हणाले.