पिंपरी महापालिका प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व, महाविकास आघाडीचे दुर्लक्ष

BJP

पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. प्रभाग समिती अध्यक्षांसह आठही जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादीला ३ तर, कॉंग्रेसला १ जागा मिळाली आहे. या निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप गटाची सरशी झाली आहे. प्रभाग अध्यक्ष होण्यास सदस्य इच्छुक नसल्याने दोन प्रभागावर जुन्या च सदस्यांना संधी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात ८ समित्यांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे पीठासीन अधिकारी होते. प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी होती. या मुदतीत केवळ भाजप नगरसेवकांनी अर्ज भरले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नव्हते. त्यामुळे बिनविरोध निवड होणार निश्चित होते. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे.

महापालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आठ प्रभाग अध्यक्षपदासाठी आठच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यांना मिळाली संधी आठही समित्या भाजपच्या हाती गेल्या आहेत. ‘अ’ प्रभाग अध्यक्षपदी शर्मिला बाबर, ‘ब’ सुरेश भोईर, ‘क’ राजेंद्र लांडगे, ‘ड’ सागर आंगोळकर, ‘ई’ विकास डोळस, ‘ग’ बाबा त्रिभुवन, ‘ह’ हर्षल ढोरे आणि ‘फ’ प्रभाग अध्यक्षपदी कुंदन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाबर, त्रिभुवन यांना दुस-यांदा संधी मिळाली आहे.नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER