किरीट सोमय्या आक्रामक, आज एसआरए कार्यालयात धडकणार

Kirit Somaiya-Kangana Ranaut

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) अभिनेत्री कंगना रानौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर भाजपने (bjp) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच मुंबईतील अवैध बांधकामांविरोधात आता कारवाई होणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) एसआरए कार्यालयात धडकणार आहेत. मुंबई महापौर फॅमिली कंपनी व इतर बोगस कंपन्यांविरूद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यासाठी एसआरएच्या पुनर्वसन इमारतीत वरळी येथे तक्रार दाखल केली होती. मात्र चौकशी झाली का? मालक? एनओसी? कायदेशीर आहे का? यासंदर्भात विचारणा करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER