एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती? भाजप नेत्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

BJP Keshav Upadhye slamsCM Uddhav Thackeray

मुंबई : भाजपाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीकास्त्र सोडले आहे . स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ढकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचे अशा शब्दात उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला .

आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं त्यासारखं पंतप्रधानानी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR एजेंन्सी वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा. कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? असा चिमटाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button