राऊतसाहेब डोळे उघडा, किती यादी सांगू?, भाजपचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Keshav Upadhye-Sanjay Raut

मुंबई :- देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, असं सांगतानाच अहंकार बाजूला ठेवून देशात महाराष्ट्र मॉडेल लागू करा, अशी मागणी करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आता भाजपाने संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत राऊतांवर पलटवार केला आहे.

‘हा देश रामभरोसे चालत आहे- संजय राऊत.’ राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले, तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?,” असं म्हणत उपाध्ये यांनी राऊतांसमोर प्रश्न उपस्थित केला आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशात सर्वात उत्तम काम महाराष्ट्रात झाले : संजय राऊत

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button