‘माझे वीजबिल मलाच झटका’, थकीत वीजबिल वसुलीवरुन भाजपची टीका

Keshav-Upadhye-Uddhav-Thackeray

मुंबई : लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात नागरिकांनाविद्युत विभागानेअव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवली होती. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. अशातच ‘महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन त्वरीत खंडित करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय म्हणजे नवी गाथा असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. माझं घर माझी सुरक्षा, माझे वीजबिल मलाच झटका, मंत्र्यांना गाड्या कंत्राटदारांना मलई आणि बिल्डरांना सवलती, गोरगरीब मागती दिलासा तर त्यांच्या नशिबी मात्र आश्वासनाचा धत्तुरा, असं म्हणत उपाध्येंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, मुळात अव्वाच्या सव्वा वीज बिल आली त्यात सवलती देण्याच्या घोषणा झाल्या पण बिल्डर, कंत्राटदारांसाठी तातडीने काम करणाऱ्या राज्य सरकारने सामान्यांच्या तोंडी पाने पुसली असल्याचंही उपाध्येंनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER