भाजपला पुन्हा धक्का ; दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांचा पक्षाला रामराम ; राष्ट्रवादी, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता

Shivsena-NCP

जळगाव :- उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश केला . त्यांच्या पाठोपाठ आता खानदेशात भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाच्या जळगाव (Jalgaon) ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील (Asmita Patil) यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्या घड्याळ हाती बांधणार, म्हणजेच घरवापसी करणार, की शिवबंधन बांधत शिवसेनेत जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.

प्रा. डॉ. अस्मिता पाटील या जळगाव भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या राज्य सदस्या होत्या. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजनामा दिल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला दिली .

‘मी अस्मिता नित्यानंद पाटील वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’ असे पत्र अस्मिता पाटील यांनी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे यांना लिहिले आहे.

अस्मिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीसोबत काही वर्ष काम केलं आहे. नुकतंच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांना घरवापसीची साद घातली होती, तिला प्रतिसाद देत अस्मिता पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, अस्मिता पाटील यांच्यासमोर शिवसेनेचाही पर्याय उपलब्ध असल्याची पाचोरा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्या हाती घड्याळ बांधणार की शिवबंधन, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे हे कसले लक्षण म्हणायचे? शिवसेनेचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER