नगरमध्ये राष्ट्रवादीच्या खेळीवर फडणवीसांनी घेतला आक्षेप ; ‘त्या’ नेत्याला बजावली नोटीस

NCP - Devendra Fadnavis

मुंबई : अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीमध्ये शिवसेनेने (Shiv Sena) माघार घेत राष्ट्रवादीला (NCP) सभापतीपदाचा मान दिला आहे. पण, या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या मनोज कोतकर यांच्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपने (BJP) आता कोतकरांना नोटीस बजावली आहे.

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतींची निवडणूक 25 सप्टेंबर रोजी पार पाडली . मात्र यादरम्यान राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादीने ऐनवेळेस भाजपातून मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली होती. मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी फारसा आक्षेप घेतला नाही. पण, या राजकीय खेळीवर आता फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भाजपने मनोज कोतकर यांनापक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER