भाजपाला हल्ली ‘जय’ आणि ‘नाथ’ चालत नाहीत! धनंजय मुंडेंचा टोमणा

Dhananjay Munde

परभणी : भाजपाला धनंजय, जयसिंग यांच्यातील ‘जय’ आजकाल चालत नाही. त्यांना गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ही चालले नाहीत. आता भाजपाला (BJP) प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.

ते परभणी येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्या प्रचार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे (Congress) मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजपा विरोधी पक्षात ही लोकशाहीची ताकद आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साऱ्यांना लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि भाजपा नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला. त्यामुळे भाजपा पराभूत मानसिकतेने निवडणूक लढवते आहे, असा टोमणा त्यांनी भाजपाला मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER