खडसे आणि मुंडेंमुळे भाजपाला राज्यात ओळख – जयंत पाटील

२०२४ला पुन्हा भाजपची सत्ता आली तर..., जयंत पाटील यांनी व्यक्ती केली 'ही' भीती

BJP is known in the state due to Khadse and Munde - Jayant Patil

जळगाव :- देशात भारतीय जनता पार्टी पक्ष हा पुंजी पंती लोकांचा पक्ष आहे समजलं जायचं परंतु गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजपा (BJP) हा बहुजनांचा पक्ष आहे म्हणून अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्याच कारणामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.

तसेच, २०१४ च्या लाटेनंतर केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपकडे सत्ता आल्यापासून देशात अनेक बदल झाले आहेत. इथला गरीब, मध्यमवर्गीय सातत्याने रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी संघर्ष करताना देश पाहतोय. अशाच काही मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा देशात २०२४ ला भाजपची सत्ता आली तर एक मोठी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

जयंत पाटील राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर आहेत. काल एका सभेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी तसंच भाजप सरकारवर शरसंधान साधलं. देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. तसंच कामगारांना युनियन देखील करता येणार नाही, असा दावा करत भाजपला इथून पुढे निवडून न देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्यापासून भाजपा वाले पुंजी पंती लोकांचं हित संपादन करतील साधतील असं लोकांना वाटायचं मात्र नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या संबंधित मदत करण्याचे कायदे मोडित निघताना दिसत आहेत. कारखान्यांमधील कामगारांना काढून टाकण्याचा अधिकार कारखानदाराकडे या मोदी सरकारने दिले आहेत, असे आरोप जयंत पाटील यांनी केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER