भाजपा ओबीसींना भडकवते आहे; अब्दुल सत्तार यांचा आरोप

Abdul Sattar & BJP

मुंबई : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) आज (२० जानेवारीला) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणावर भाजपा (BJP) राजकारण करते आहे. मराठा आणि ओबीसींना भडकवण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर निर्णय होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्ट हा या देशाचा सुप्रीमो पॉवर आहे, सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असेल, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER