ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय – अनिल देशमुख

Anil Deshmukh.jpg

मुंबई :- ईडीच्या (ED) आडून भाजप (BJP) सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे असे मत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अग्रलेखात सडके, पादरे शब्द वापरण्यापेक्षा…  ; भाजप नेत्याचा  संजय राऊतांवर  हल्लाबोल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER