भाजपा हिंदू धर्माला बदनाम करत आहे : काँग्रेसचा आरोप

Maharashtra Today

मुंबई : अनलॉकच्या प्रक्रियेत मंदिरांचा समावेश नसल्याने भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी – राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुघलांचे सरकार आहे. अनलॉकमध्ये सर्व गोष्टींना परवानगी दिली, फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही, असा इशारा दिला.

यावर काँग्रेसचे(Congress) प्रवक्ते सचिन सांवत यांनी – भाजपा (BJP)हिंदू धर्माला बदनाम करते आहे, असा आरोप केला. ते म्हणाले की, राजकारण व अध्यात्म परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपा या अधर्माचा अध्यात्माशी काय संबंध? भाजपा अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम व भोंगळवाद स्थापित करण्याचे काम भाजपा करते आहे. अनाचार्याच्या भाषेचा अध्यात्माशी दूरचाही संबंध नाही. धर्माच्या राजकारणासाठीचे हे थोतांड बंद करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button