भाजपा तामिळनाडूत, बंगालमध्ये निवडणूक लढते आहे आणि काँग्रेसचे नेते आपसात ! – संजय निरुपम

Sanjay Nirupam

मुंबई : बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणकून पराभव झाल्यानंतर पक्षात पुन्हा नेतृत्वावर टीका करत नेते पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी करत आहेत. त्याच वेळी भाजपाने तामिळनाडू आणि पश्चिमच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यावरून काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर टीका करताना संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ३ ट्विट केले. त्यांचे पहिले ट्विट आहे – भाजपा तामिळनाडूत, बंगालमध्ये निवडणूक लढते आहे आणि आमचे नेते आपसात, ते ही जाहीरपणे!

संजय निरुपम या ट्विटमध्ये मोठे पद बळकावून बसलेल्या निष्क्रिय नेत्यांना टोमणा मारताना म्हणाले – जे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये अनेक वर्षांपासून पद बळकावून बसले आहेत तेच आपसात भांडत आहेत. चांगले काही झाले की श्रेय लाटायचे आणि वाईट झाले की टीका करायची, हेच काम ते करत आहेत. पक्षातील मोठ्या नेत्याची आस्था पक्षाच्या नेतृत्वावर राहिली नाही. यामुळे पक्ष आणखी दुबळा होईल.

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात – जोपर्यंत पक्षाचे शीर्ष नेतृत्व कंबर कसून उभे होत नाही तो पर्यंत खालच्या पातळीवर निरुत्साह आणि गोंधळाची स्थिती कायम राहील. यावर उपाय एकच, राहुल गांधींनी तत्काळ पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे आणि पक्षात मुळापासून बदल करावेत. मेहनती आणि उर्जावान नेत्यांना पुढे आणावे. चमत्कार होईल.

निरुपम तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात – आमची ‘नरेटिव्ह’ची रेकॉर्ड घासली गेली आहे. नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. काँग्रेसने देशाला नेहमी नव्या कल्पना आणि सामायिक दृष्टीकोन दिला आहे. त्यामुळे देशाचे भले झाले आहे. पक्षालाही नवजीवन मिळाले. देशाला काँग्रेसचा नवा अवतार हवा आहे आणि आम्ही जुनी परिपाठी सोडायला तयार नाही. परिवर्तन हे नैसर्गिक सत्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER