भाजप शब्द पाळणारा, नितीश कुमारच मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींचा शिवसेनेला टोला

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

नवी दिल्ली : देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसचं (Congress) नाव न घेता केली.

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections) एनडीएने (NDA) बहुमताचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपनेही दणदणीत यश मिळविलं असून आज हजारो भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोर जमून दणक्यात सेलिब्रेशन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. देशाच्या राजकारणाचा मुख्य आधार हा विकास हाच आहे. बँक खाते, गॅस कनेक्शन, घर, चांगले रस्ते, रेल्वे स्टेशन, विमानतळ, शाळा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगातानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, असं मोदी म्हणाले. एनडीएवर जनता जो स्नेह दाखवला त्याचं कारण विकास आहे. देशाला पुढे नेण्यासाठी काम करत राहणार, असा मी विश्वास देतो, असंही ते म्हणाले.

भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्यात गरिब, पीडित, दलित, शोषित, वंचित आपलं भविष्य बघतात. देशातील प्रत्येक घटकाचा विचार भाजप केला जातो. त्यामुळेच जनतेचा भाजपवर विश्वास वाढला आहे. भाजपवर जनतेचा आशीर्वाद आणि स्नेह निरंतर वाढत चालला आहे, असं सांगतानाच बिहारमध्ये पक्षाने अगोदरपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. गुजरातमध्ये भाजप ९० व्या दशकापासून आहे. मध्यप्रदेशातही भाजप सत्तेत आहे. देशातील नागरिक भाजपवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहेत, असं ते म्हणाले.

काल जे निकाल आले त्याचा अर्थ खूप खोल आहे. त्याचे उद्दीष्टे खूप मोठे आहे. लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले होते, त्याचे कालचे निकाल हे विस्तार आहेत. भाजप पूर्वेत जिंकला. भाजपला गुजरात, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकात विजय मिळाला. दोन केंद्रशासित प्रदेशातही निवडणूक झाली. लड्डाख, दिव-दमनमध्ये भाजचा विजय झाला. देशाच्या प्रत्येक नागरिकाने भाजपला वाढवला आहे, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.

देशाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. भाजपकडे सायलन्ट व्होटर आहे. तोच भाजपला निरंतर मतदान करतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तो सायलंट व्होटर देशातील माता, भगिनींचा महिलावर्ग आहे. देशभरातील महिला व्होटर भाजपाची सर्वात मोठी सायलंट व्होटर आहे. भाजपाच्या राज्यातच महिलांना सुरक्षा आणि सन्मान मिळतो. विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ‘त्यांचं’ डिपॉझिट जप्त झाल, असे म्हणत मोदींनी शिवसेनेला (Shiv Sena) टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER